वैधता प्रमाणपत्रासाठी लाच मागणारे अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच मागणार्‍या तिघांना रात्री लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील हिंदी सेवा मंडल संस्थेतील कर्मचारी घनश्याम टेमाणी याने एका विद्यार्थीनीला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधीत विद्यार्थीनीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक गोपाळ ठाकूर आणि त्यांच्या पथकाचा या सापळ्यात समावेश होता. या पथकाने टेमाणी याला ४० हजार घेतांना अटक केली. यानंतर या प्रकरणातील त्याचे साथीदार ललीत खुशाल किरंगे आणि ललीत ठाकरे यांना अटक करण्यात आली.

Protected Content