बी.जे.मार्केट परिसरातून दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २२ जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुकदेव यशवंत सोनवणे (वय-४८) रा. बालाजीपेठ, सराफबाजार, जळगाव हे व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुकदेव सोनवणे हे दुचाकी (एमएच १९ बीएच ८४२३) ने शहरातील बी.जे. मार्केट परिसरात कामाच्या निमित्ताने आले. त्यांनी त्यांची दुचाकी बी.जे.मार्केट मधील विजय पान दुकानासमोर पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनीवारी २२ जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे करीत आहे.

Protected Content