यावल बसस्थानकात पुन्हा महिलेचे मंगळसुत्र चोरीला

crime bedya

यावल प्रतिनिधी । यावल बसस्थानकात बुधवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा महिलेचे मंगळसुत्र लंपास केल्याची घटना घडली. मंगळसुत्र चोरीची आठवड्यातील ही पाचवी घटना आहे.

येथील बसस्थानकाच्या परिसरात मागील आठवडयात अज्ञात चोरटयांकडुन बसमध्ये प्रवास करणाऱ्या महीलांच्या सोन्याच्या मंगळसुत्रांच्या चार घटना घडल्या असतांना काल प्रवासी नागरीकांच्या सतर्कतेने व पोलीसांच्या दक्षतेमुळे दोन महीलांना पर्समधील पैसे चोरतांना रंगेहात पकडण्यात आले होते. चोरीच्या आरोपाखाली बु्ऱ्हाणपुर मध्यप्रदेश मधील दोन महीलांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यामुळे मंगळसुत्र चोरीच्या तक्रारी वाढत आहे. तालुक्यातील कोरपावली येथील राहणारे कृउबा संचालक राकेश फेगडे यांच्या पत्नी भावना फेगडे या यावलहुन मोहराळा जाण्यासाठी बस क्रमांक (एमएच २०, बीएल १४०३) या बसमध्ये बसल्या असतांना दोन अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळयातील चार ग्रॅमचे मंगळसुत्र तोडुन लांबवुन चोरल्याची घटना उघडकीस आली. यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी त्या दोन चोरट्यामहीलांना अटक करताच मंगळसुत्र पोत चोरीच्या तक्रारींची संख्या पाचवर पहोचली आहे.

Protected Content