चोपडा फार्मसी महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । येथील फार्मसी महाविद्यालयात अ.भा.तंत्रशिक्षण परिषद यांच्या सौजन्याने १५ व १६ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास कवयित्री बहिणाबाई विद्यापीठाचे कार्यकारी रजिस्ट्रार डॉ.बी.व्ही. पवार, अधिष्ठाता डॉ.ए.बी. चौधरी, डॉ.पायल दाडे निम्स शिरपुर, डॉ. सुमीत दिवेदी ओरियेटल कॉलेज ऑफ फार्मेसी इंदौर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सर परिषदेला 200 विद्यार्थी व शिक्षकानी आपल्या नावाची नोंदणी करण्यात आली आहे. त्यातील 150 शोधनिबंध सादर होणार आहे. तर 16 फेब्रुवारी प्राचार्य डॉ.एस.डी. ब‌‌ऱ्‍हाटे जामनेर, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, शहादा प्राचार्य डॉ.टी.ए. देशमुख ममुराबाद यांच्या प्रमुख उपस्थितित पोस्टर प्रेजेंटेशन कॅाम्पीटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत यावेळी डिजीटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी अॅड.संदीपभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेत आहेत.

Protected Content