अमळनेर (ईश्वर महाजन) आज अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. खान्देशात घरोघरी अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटे मातीचे भांडे ठेवून त्यावर टरबूज आणि 2 सांजोऱ्या,दोन आंबे ठेवतात. पितरासाठी छोटं भांडंही ठेवले जाते. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो.एकंदरीत संपूर्ण खान्देशात उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा केला जातो.
सकाळी उंबरठयाचे औक्षण करून पुर्वाजांचे स्मरण करून कुंकवाचे एकेक बोट उंबरठ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पित्तारांना आमत्रण दिले जातं. दुपारी चुलीवर आता गॅस वरच घास टाकतात कारण तुला ही पद्धत सध्या कालबाह्य होत चाललेली आहे पण ग्रामीण भागात आजही तुला पाहायला आपल्याला मिळेल आमरस पुरणपोळी कटाची आमटी भजी कुरडई असा जबरदस्त बेत असतो आज पासून आंबे खायला सुरुवात करतात काही सामाजिक कार्यकर्ते अक्षय तृतीयेला पाणपोई लावून वाटसरूंना पाण्याची व्यवस्था केली जाते. खानदेशात आखाजीचे अजून एक महत्त्व आहे का म्हणून खानदेशात सासूर्वाशिन चाही आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं दिवाळी आखाजी दिवाळी घाईगडबडीत देणे-घेणे करण्यात जाते .आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रटटयातून तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.
सासुरवाशिणींना गौराई असं म्हटलं जातं आणि जावायाला शंकर जी! माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात भावाबरोबर माहेरी निघालेली ‘ती’ उन्हाने तापून लाल झालेल्या खडकावरून चालत कधी पळत निघताना बेगडी वाहनेचा उपयोग होत नाही .त्यामुळे पायेही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेऊन विसावा घेऊन नव्या दमाने पुन्हा ती माहेरच्या वाटेला लागते. माहेरी या सासुरवाशीनंच किती गोडंकौतुक. आमरस पुरणपोळीच गोडं जेवण, पुडाच्या पाटोडया आणि काय काय…..! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाला झोका बांधला जातो.गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरू होते. सर्व भाऊबंदकीतील माहेरवाशीण एकत्र येऊन चर्चा रंगतात. नवीन लग्न झालेल्या जावायला सासरच्या घरी वानं लावलं जाते. त्याला मोठा मानसन्मान केला जातो. त्याला सासरा मंडळीकडून कपडे व मुलीला साडी घेतली जाते.