वाढीव घरपट्टीविरोधात भाजपाचे महापालिकेसमोर निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढीव घरपट्टीच्या संदर्भात चुकीच्या पध्दतीने व अवाजवी आकारणी केलेल्या नोटीसा पाठविल्याच्या विरोधात बुधवार १२ एप्रिल रोजी जळगाव भाजपा महानगरच्या वतीने भव्य मोर्चा काढून महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी वाढीव घरपट्टी रद्द करण्यासंदर्भात आयुक्त सतिश कुळकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहर महानगरपालिकेने संपूर्ण शहरात घरपट्टी फेर मूल्यांकनाचे कार्य सुरू केले आहे. परंतु फेरमूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केले असल्याबाबत भारतीय जनता पार्टी व नागरीकांनी निवेदने दिली होती. असे असतांना देखील प्रशासनाने  निवेदनाची व नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेता सर्रासपणे मालमत्ता करात वाढ केलेली आहे व वाढीव घरपट्टीची बिले सुद्धा नागरिकांना वाटप करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे जळगावकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान जळगाव शहरात गटारी नाही, स्वच्छता नाही, रस्ते सुव्यवस्थित नाही, पाण्याची सुविधा नाही असे असतांना  वाढीव अवाजवी घरपट्टी आकारणी केली आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने बुधवार १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भव्य रॅली काढून महापालिकेवर धडकला. महापालिकेसमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. वाढीव घरपट्ट्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त सतिश कुळकर्णी यांना देण्यात आले.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी आमदार स्मिताताई वाघ, खासदार उमेश पाटील, माजी महापौर भारती सोनवणे,  यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1076587349564541

Protected Content