औरंगाबादमध्ये सुरु होणार सुसज्ज फिल्म प्रॉडक्शन हाऊस

23a9fc23 a0a9 4167 83f2 b05a221230ce

 

अमळनेर (ईश्वर महाजन) मराठवाड्यातील चित्रपट कलाकार , तंत्रज्ञ आणि निर्मात्यांसाठी संजीवनी ठरणारं अद्ययावत फिल्म प्रॉडक्शन हाऊस आता ऐतिहासिक औरंगाबाद शहारात लवकरच होत आहे. या प्रकारच्या उपक्रमामुळे चित्रपटसृष्टीशी खऱ्या अर्थाने जवळीक साधण्याची संधी ग्रामीण भागातल्या तरुणांना मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी आनंदाची बाब म्हणजे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील रमाकांत महाजन हे या प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक प्रोडक्शन डिज़ाइनर आहेत.

 

 

चित्रपट व्यवसायात आपला ठसा उमटवणारे अनेक दिग्गज कलावंत आणि तंत्रज्ञ मराठवाडा , जळगाव , नाशिक या भागाने दिले आहेत . दुष्काळग्रस्त या भागात अनेक नवोदितांना या क्षेत्रात उतरण्याची इच्छा असते आणि धडपडही केली जाते पण त्यासाठी भागात संधी उपलब्ध नसल्याने कायम पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन संघर्ष करावा लागतोच लागतो . या भागात चित्रिकरणायोग्य अशी अनेक रम्य तसेच ऐतिहासिक ठिकाणे देखील आहेत. पण तरीही निर्मात्यांपर्यंत हि ठिकाणी पोहोचली जात नाहीत याच जाणीवेने प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक प्रोडक्शन डिज़ाइनर रमाकांत महाजन आणि विविध वाहिन्यांसाठी प्रोडक्शन हेड असलेले मनीष गोस्वामी यांच्या संकल्पनेतून व लेखक/दिग्दर्शक नंदू अचरेकर यांच्या अनुभवी योगदानाने तसेच अनिल महाजन यांच्या सहकार्यातून व राऊत बंधूंच्या राजमुद्रा प्रकाशनाच्या समर्थनामुळे औरंगाबाद शहरात Rockaway Productions ची स्थापन झाली आहे. याच ROCKWAY PRODUCTION च्या माध्यमातून आता औरंगाबाद येथे फिल्म प्रॉडक्शन हाऊस लवकरच सुरु करण्यात येत आहे.

 

 

रमाकांत महाजन यांनी जे . जे . स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथून कलाशाखेची पदवी प्राप्त केली आहे. यशस्वी कलादिग्दर्शक म्हणून चित्रपट, मालिकांसाठी काम करताना महाजन यांनी आपले २५ वर्षे मोलाचे योगदान चित्रपटसृष्टीला दिले आहे. रेडी , ग्रांड मस्ती, नो प्रॉब्लेम, आय लव एन वाय यासह जवळपास अन्य ३० चित्रपटाचे कलादिग्दर्शन महाजन यांनी केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द शोले गर्ल ( रेश्मा पठाण “ यासारख्या वेब सिरीजचेही कलादिग्दर्शन रमाकांत महाजन यांनी केले आहे. गाजलेल्या ६० पेक्षा जास्त टेलिव्हिजन मालिकांचे कलादिग्दर्शक असलेल्या रमाकांत महाजन यांनी २०१७ – २०१८ साली असोशिएशन ऑफ सिने एंड टेलिव्हिजन आर्ट डायरेक्टर एंड कोस्च्यूम दिझायनर असोशिएशन (बॉलीवूड )चे जनरल सेक्रेटर पदही भूषविले आहे.
ROCKWAY PRODUCTION च्या माध्यमातून औरंगाबाद येथे होणाऱ्या या फिल्म प्रॉडक्शन हाऊसमुळे चित्रपटासाठी तसेच टेलिव्हिजन मालिकांसाठी सुसज्ज सेटची निर्मिती करण्यात येणार आहे. ज्यामुळे मराठी हिंदी चित्रपट निर्मिती करण्यास निर्मात्यांना सोयीस्कर होईल. जिल्ह्यातील तसेच मराठवाडा विभाग , खान्देश विभाग, जळगाव , धुळे, नंदुरबार, नाशिक , अहमदनगर यासारख्या भागातल्या कलाकारांना , तंत्रज्ञांना चित्रपटसृष्टीत प्रवेश आणि रोजगाराच्या वाटाही निर्माण होतील. दरम्यान, ROCKAWAY PRODUCTIONS च्या माध्यमातून या प्रोडक्शन हाऊसचे काम सध्या युद्धपातळीवर चालू असून प्रोजोन मॉल जवळील गोल्डन सिटी सेंटर येथे त्यांचे कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे. चंदेरी दुनियेच्या वाटेवर पाऊल टाकू इच्छिणाऱ्या नवोदितांना आपल्याच भागात संधी मिळाली तर ‘चित्रपटसृष्टी आली दारी’ असं कुणी म्हणाल्यास नवल वाटणार नाही.

 

ROCKAWAY PRODUCTIONS या कंपनीचे प्रमुख उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

 

• स्क्रिप्ट्स / CONCEPT DEVELOPMENT
• चित्रपट पूर्व निर्मिती.
• चित्रपट निर्मिती.
• पोस्ट प्रोडक्शन (EDITING/ POSTPRODUCTION/ DUBBING/VFX/ FINAL COPY)
• विविध जाहिरातपटाची निर्मिती करणे.
• शॉर्ट फिल्म, माहितीपट, राजकीय माहितीपट आणि म्युझिक VIDEO अल्बम
• चित्रपट आणि टेलीविजन मालिकांसाठी (FICTION AND NON- FICTION) लागणाऱ्या विविध सेटची निर्मिती करणे.
• लाईन प्रोडक्शन
• केटरिंग
• स्थानिक कलाकार उपलब्ध करून देणे.
• क्राउड कलाकार (जुनिअर आर्टिस्ट ) उपलब्ध करून देणे.
• सुरक्षा रक्षक (BOUNCERS) उपलब्ध करून देणे.
• मिडिया आणि जनसंपर्क
• हॉटेल एकोमोडेशन
• ट्रान्सपोटेशन / शहर व शहर बाह्य प्रवासाचे नियोजन करणे.
• फिल्म मार्केटिंग / वितरण
• कलाकार/ तंत्रज्ञ नोंदणी
• कलाकारांच्या ऑडिशन
• टेलीविजन आणि चित्रपट अक्टिंग वर्कशॉप्स/ पर्सनालीटी डेवलपमेंट
• लोकेशन हटिंग/ त्यांच्या मान्यता व करार
• इवेंट मेनेजमेंट/ वेडिंग डिझाईन आणि फेब्रिकेशन
• इंटीरियर डिजाइनिंग एंड एक्सेक्यूशन (रहिवासी / औद्योगिक)
• एक्झीबिशन स्टॉल आणि मेनेजमेंट
• सेलीब्रेटी मेनेजमेंट

Add Comment

Protected Content