हतनूर धरणातील आवर्तन कालव्यातून द्यावे : अमळनेर नगराध्यक्षांची विनंती

canal02

अमळनेर प्रतिनिधी | शहरात यंदाही सरासरीपेक्षा सुमारे २५ टक्क्यांनी कमी पाऊस झाला असून भीषण पाणी संकट निर्माण झाले आहे. सरकारने तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. तसेच शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी हतनूर धरणातून ३० जून रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी नदीपात्रातील कलाली डोहानजीक असलेल्या विहिरीपर्यंत पोहोचताना खुल्या नदीपात्रातून सुमारे ८५ किमीचा प्रवास करणार असल्यामुळे त्याच्यात मोठी घट होणार आहे. त्यामुळे हतनूर धरणातील आवर्तन हे कालव्यातून देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.

 

या पत्रात म्हटले आहे की, हा भाग सतत दुष्काळग्रस्त असतो. तालुक्यात असलेला पाडळसे धरण प्रकल्प गेल्या कित्येक वर्षात पूर्ण होवू न शकल्याने तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती दूर झालेली नाही. अशातच आता सोडलेले आवर्तन पोहोचेपर्यंत त्यातील बरेच पाणी नदीपात्रात झिरपून नष्ट होणार आहे त्यामुळे हे आवर्तन कालव्यातून सोडले जावे, तसेच पाणी झिरपू नये यासाठी नदीपात्रात प्लास्टिक कापड अंथरावे, एका पाणीपुरवठा करणाऱ्या कलाली डोहापासून जळोद
डोहापर्यंत पाईप लाईन टाकावी, शहराला तातडीचा पाणी पुरवठा करणारी योजना मालखेडा डोहउद्भव ते जळोदपर्यंत पाईप लाईन टाकावी, यावर्षी “श्रीसंत सखाराम महाराज समाधी व्दिशताब्दीवर्ष”, “श्रीसंत सखाराम महाराज पारंपारीक यात्रोत्सव” आणि “मुस्लीम समाजाची सुनेदावत इस्लामी इस्तेमा” या कार्यक्रमांसाठी शहरात पाण्याचे नियोजन करायचे असल्याने सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Protected Content