उन्मेष पाटील यांच्या अमळनेर तालुक्यातील जास्तीच्या मताधिक्यात शिवसैनिकांचाही सिंहाचा वाटा

WhatsApp Image 2019 05 24 at 8.22.12 PM

अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीतअमळनेर तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व आघाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने प्रचार करूनउन्मेष पाटील यांना तालुक्यातून जास्तीचे मताधिक्य मिळवून दिले.  त्यांच्या विजयात शिवसैनिकाचाही सिंहाचा वाटाअसल्याचा दावा सेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी तालुकाप्रमुख विजू मास्तर उपस्थित होते.

भाजपाच्या सर्वच गटांसोबत,सहयोगी आमदार शिरीष चोधरी सोबतही आमचे सर्व पदाधिकारी संपर्कप्रमुख संजय सावंत, ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार प्रचारांत मनापासुन काम केले, शेवटचे 3 दिवस तालुका संपर्क प्रमुख दिपक पाटील हे अमळनेरात तळ ठोकून होते. शिवसैनिकांनी केलेल्या प्रचाराची दखल मुखमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही घेतली व उन्मेष पाटील यांनीदेखील मनापासून आभार व्यक्त केल्याचे डॉ. पिंगळे यांनी सांगितले. भविष्यात अमळनेर तालुक्याचा ज्वलंत प्रश्न पाडळसरे धरण खा. उन्मेष पाटील यांनी पूर्ण करावे मागणी यांना यावेळी डॉ. पिंगळे यांनी केली. खासदार पाटील यांच्या विजयात उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें , तालुकाप्रमुख विजू मास्तर , शहरप्रमुख प्रताप शिंपी , संजय कौतिक पाटील , नितीन निळे , महिला आघाडीच्या शहरप्रमुख मनिषा परब, संगीता शिंदे व त्यांची सर्व महिला आघाडी,युवासेना प्रमुख आकाश परदेशी व अनिल महाले त्यांचे सर्व युवसैनिक, एस टी कामगार सेना, व्यापारीसेनेचे जितू झाबक व विमल बाफना,माजी उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र देशमुख,सुभाष भांडारकर, माजी तालुकाप्रमुख किसन पाटील, उपतालुकप्रमुख चंद्रशेखर पाटील, विलास पवार,बी. यु. पाटील, उपशहरप्रमुख जीवन पवार, मोहन भोई, शहर संघटक चंद्रशेखर भावसार, वैद्यकीय सेनेचे डॉ. शशिकांत सोनार, एस. टी. कामगार सेना पदाधिकारी, सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख, बुथप्रमुख, शाखाप्रमुख यांनी प्रचाराला गती दिल्याचे त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content