सुप्रीम कॉलनीतील तरूणाचा आ.भोळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुप्रीम कॉलनी परिसरातील अनेक तरूणांनी शनिवारी १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन तरूणांनी दिले आहे.

जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९ येथील सुप्रीम कॉलनीतील १०० पेक्षा अधिक तरुणांनी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.राजूमामा भोळे यांनी पक्षाचा गमछा गळ्यात टाकून तरुणांचे स्वागत केले. प्रसंगी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विठ्ठल पाटील, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, विजय वानखेडे, प्रदीप बोरोटे, किसन मराठे, लखन वंजारी, प्रकाश वंजारी आदी उपस्थित होते. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विविध समाजाच्या तरुणांचा समावेश होता.

Protected Content