ब्रेकींग न्यूज : तीन मुलांना पोरकं करून दाम्पत्याचा टोकाचा निर्णय !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विट भट्यावर काम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवणाऱ्या दोघ पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी विवरे खुर्द( ता रावेर) येथे घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.भाऊबीजला ही दुदैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबत वृत्त असे की विवरे खुर्द (ता रावेर) येथिल कुंभार वाडा येथे आज दुपारी एकच्या सुमारास दोघ पती पत्नीने आत्महत्या केली आहे. पती अनिल देविदास हरणकर (वय ४०) तर पत्नी शितल अनिल हरणकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहे.दोघांना एक मुलगी व दोन मुले आहे.विटाच्या भट्यावर काम करुन उदानिर्वाह करून आपले कुटुंब चालवत होते.परंतू अचानक दोघांनी आज टोकाचे पाऊल उचलले.राहत असलेल्या कुंभार वाड्यात वरच्या रूम मध्ये दोघ पती-पत्नी यांनी लांब रुमालच्या सहायाने गळफास घेतली.ही घटना त्यांचा लहान मुलगा पाणी पिण्यासाठी वरच्या रूम मध्ये गेला असतांना समजली. यावेळी आजू-बाजू लोक जमा होऊन दोघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.

विवरे खुर्द गावात प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते.यामुळे गरीब कुटुंबातील मुल व्यसनाधीन होत आहे. दारूमुळे अनेकांच्या संसारात
क्लेश निर्माण होत असुन भांडन होत आहे. मयत अनिल याला देखिल दारूच व्यसन होते यातून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. असे गावातील नागरीकांनी आक्रोश करत ग्रामीण रुग्णालयात पत्रकारांना सांगितले.गावात दारूचा बंदोबस्त करून आमच्या मुलांना व्यसना पासुन वाचवा.अशी आर्त हाक त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.