लोखंडी कोयता बाळगणाऱ्या हद्दपार गुन्हेगारावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी जळगाव शहरातून हद्दपार असतांना खंडेराव नगरातील रेल्वेपुलाजवळ लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर रामानंद नगर पोलीसांनी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कारवाई केली. त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान हरचंद भोई वय-२९, रा. खंडेराव नगर जळगाव असे गुन्हेगाराचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खंडेराव नगर मधील रेल्वेपुलाजवळ दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला गुन्हेगार समाधान हरचंद भोई हा हातात लोखंडी कोयता घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कारवाई करत समाधान भोई यांच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई उमेश पवार यांनी दिलेले फिर्यादीवरून रात्री ११ वाजता संशयित आरोपी रामानंद समाधान हरचंद भोई वय-२९ रा. खंडेराव नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे करीत आहे.

Protected Content