विषारी औषध घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

शासकीय रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील कौटुंबिक वादात सासूने विषारी औषध घेतल्यानंतर विषारी औषध हातातून ओढतांना झालेल्या झटापटीत अंगावर पडलेल्या औषधामुळे दोन्ही सुनांना विषबाधा झाल्याची मंगळवारी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. यातील सासूची तब्बेत खालावल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान रात्री ९ वाजता मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मैसुनाबाई दिलीप तडवी वय -४५ रा. घोरकुंड ता. सोयगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, मैसुनाबाई तडवी या महिला आपल्या दोन सुना आणि परिवारासह घोरकुंड ता. सायेगाव येथे वास्तव्याला होत्या. त्यांच्या घरात नेहमी किरकोळ वाद सुरू होत राहतात. मंगळवारी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मैसुनाबाई ह्या घरी असतांना त्यांच्या सुना सपना राजू तडवी (वय-२५) आणि रूबीना आशिष तडवी (वय-२२) यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. यात मैसुनाबाई यांनी संतापाच्या भरात पिकांवर फवारणीचे औषध सेवन केले. यात सेवन करत असतांना त्यांच्या सुना सपना तडवी आणि रूबीना तडवी यांनी आवराआवर केली. परंतू त्यांच्या आंगावर देखील विषारी औषध पडले व त्यांना देखील विषबाधा झाला. तिघांची तब्बेत खालावल्याने त्यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर यातील मैसुनाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यासह दोघांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान मैसुनाबाई यांच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी जिल्हा शासकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content