भरधाव दुचाकीची रिक्षाला धडक; एकजण गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथून अडावदकडे जात असलेल्या प्रवाशी रिक्षाला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवासी जखमी झाला. यात दोघी वाहनांचे नुकसान झाले. ही घटना जळगाव ममुराबादरोडवर घडली. याप्रकरणी दुचाकीचालक विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ हनुमंत पाटील (वय-३२) रा. वडगाव बुद्रुक ता. चोपडा हे रिक्षा चालक आहे. १९ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते प्रवासी भास्कर लिलाधर साबळे (वय-४०) यांना (एमएच १९ ई ८७८०) ने जळगाव ते ममुराबाद रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल (एमएच १९, ६२५२) याने भरधाव वेगात येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षामधील प्रवासी भास्कर साबळे हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रिक्षाचालक गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीधारक प्रमोद गोपाळ सरदार रा.गोरगावले ता.चोपडा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बापू कोळी करीत आहे.

Protected Content