दुचाकी अपघात तरूण जखमी; एकावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील गायत्री नगरात राहणाऱ्या तरुणाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पायाला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दुचाकीधारकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. धीरज भास्कर बारी रा. गायत्री नगर, जळगाव २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण करून शिरसोली रोडवर शतपावली करत होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या (एमएच १९ एएम ३६४२) वरील दुचाकीस्वार रविंद्र पांडुरंग बोरनारे याने धिरजला जोरदार धडक दिली. या अपघातात धीरज बारी याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. धीरजला तातडीने जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान तब्बल महिनाभरानंतर काल सोमवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता धीरजचे आजोबा रतन शंकर बारी यांच्या फिर्यादीवरून दुचाकीचालक रविंद्र पांडुरंग बोरनारे याच्याविरोधात  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

 

Protected Content