नवीन बी.जे. मार्केटमधील प्रिंटींग प्रेस दुकानाला भीषण आग ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीनन बी.जे. मार्केट येथील तिसऱ्या मजल्यावरील प्रिंटींग प्रेस दुकानाला गुरूवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट येथील तिसऱ्या मजल्यावर विकास नारखेडे यांच्या मालकीचे अमोल इंटरप्रायझेस नावाचे प्रिंटींग प्रेस दुकान आहे. या ठिकाणी लहान मोठे पत्रक छापाईचे काम केले जाते. गुरूवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. यामुळे काही वेळात भीषण आगीत रूपांतर झाले. यावेळी मार्कटमधील नागरीकांची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीत दुकानातील छापाई मशीनरीसह कागद जळून नुकसान झाले आहे.

 

Protected Content