बालविवाह रोखण्यासाठी शाळकरी मुली अन् विद्यार्थीनींच उतरल्या रस्त्यावर

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सध्याच्या काळात होत असलेले बालविवाह रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या बरोबर वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेने पुढाकार घेतला आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था व धरणगाव येथील महसूल विभाग यांच्या संयुक्त बाल प्रतिबंधक अभियान राबविण्यात येत आहे. बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान मोहीम कार्यास हिरवे झेंडे दाखवून धरणगाव येथून या अभियानाला सुरुवात झाली आहे.

 

या अभियानाचा धरणगाव येथे नायब तहसीदार लक्ष्मण सातपुते व सहाय्यक गट विकास अधिकारी कैलाश पाटील  तसेच वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी  जितेंद्र गोरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शाळकरी मुली आणि विद्यार्थीनीच बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.   हे जनजागृती अभियान धरणगाव तालुक्यातील एकूण 30 गावामध्ये राबविण्यात येणार आहे. वाहनावर तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आशयाचे हातात धरलेले जनजागृती फलकांनी यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

 

जनजागृतीपर काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शाळांमधील विद्यार्थीनींचा तसेच तरुणींचा सहभाग असल्याचं पाहालया मिळालं. यावेळी बालविवाह रोखण्यासंदर्भातील प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली.  या अभियानातून बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे, याबरोबरचे त्याचे परिणाम, कायदा यासह विविध विषयांवर गावांमधील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे हा बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान मोहीम एकून 30 गावात एक सप्ताह पर्यंत चालणार आहे.

 

या वेळेस नायब तहसिलदार तथा दंडाधिकारी लक्ष्मण सातपुते यांनी या जाणीव – जागृती अभियानाला शुभेच्छा देऊन बाल विवाह थांबवला पाहिजे या शासनाच्या अभियानाला आपण सगळ्यांनी हात भार लावला पाहिजे व या अभियानास प्रत्येक घरा घरात व गाव गावात ही माहिती पुरवली पाहिजे व मुलांचे संरक्षण केले पाहिजे. तसेच कैलाश पाटील यांनी या कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे यावे व बाल विवाह थांबवला पाहिजे असे आवाहन केले. त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन इंडिया जितेंद्र गोरे यांनी सुध्दा यावेळी मनोगतात बाल विवाह थांबवणे जाणीव – जागृती अभियानास आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक गावात ही माहिती पुरवली पाहिजे व बाल विवाह थांबवला पाहिजे व मुलांच्या सार्वांगिक विकासासाठी आपण ऐकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर वर्ल्ड व्हिजनच्या समन्वयकांनी नेमकं हे अभियान कशापध्दतीने राबविण्यात येणार आहे, याबाबतची भूमीका स्पष्ट केली. तर यावेळी अभियानात सहभागी विद्यार्थीनी मुलींनी त्यांच मत व्यक्त करतांना मुलींना शिकू दिलू पाहिले, मुली या सुध्दा आता सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. बालविवाह करुन त्यांच बालपण हिरावू नका, बालविवाह करु नका अशी भावनिक साद या अभियानातून जनजागृती करतांना नागरिकांना घातली. तसेच आमच्यासाठी वर्ल्ड व्हिजन इंडियाने जो पुढाकार घेतला त्याबाबत त्याचे आभार सुध्दा मानले.

Protected Content