धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हातील धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाचे नेते संदीप सावळे व डॉ स्नेहा सोनकाटे यांनी मुंबईत भेट घेऊन निवेदन देण्यात आले. अनेक वर्षापासुन जळगावसह रावेर तालुक्यातील मेंढपाळकांचा प्रश्न सद्या गाजत आहे.

 

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, धनगर समाजाचा प्रमुख उपजिवेकेचे साधन मेंढी पालन असून हा समाज जगला पाहिजे त्याचा परिवार व कुटूंब हे स्वांतत्र काळापासून मेढी पालन करुनच कुटूंब चालत असतो परंतु अद्याप सुध्दा मेढी चराईचा विषय सुटला नाही. निवडणूकांच्या जाहिरनाम्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय व मेढी चराईचा विषय सोडविण्या संबंधी आश्वसन देत असतात. परंतु सदर विषयानुसार धनगर समाजाच्या आरक्षणाचा व मेढी चराईचा विषय हा ‘जसाचा-तसा रहात आहे. पावसाळ्यामध्ये मेंढपाळाच्या मेढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मेढ्या मरण पावतात प्रामुख्याने जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये धनगर समाजाचे उपजिवेकेचे साधन मेंढी पालन यावर अवलंबून असून रावेर तालुक्यासाठी धनगर समाजाच्या मेढयाकरीता मेंढी चराईचे क्षेत्र शासनाकडे उपलब्ध असून सुध्दा मेंढपाळाना सदरचे क्षेत्रात मेंढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करावे. तसेच शासनाकडून मेंढी चराई क्षेत्र उपलब्ध न झाल्यास आम्ही धनगर समाज मंत्रालया समोर लोकशाही मार्गाने मोठे आदोलन करु यास आपण व आपले सरकार जबाबदार राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content