तीन अनाथ बालकांना शासनाचा मदतीचा हात; संगांयोद्वारे मिळणार मदत

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संत रोहिदास नगर मधील रहिवासी तीन अनाथ बालकांच्या भवितव्य व उदार निर्वाहासाठी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी योजनेच्या माध्यमातून मदतीची मागणी तात्काळ मंजूर करीत स्वतः तहसीलदार बंडू कापसे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व मंजुरीचे आदेश सुपूर्द केले आहे.

 

लहानपणी आई वडिलांचे छत्र हरवलेले कु. प्रगती विलास पाटील, कृष्णा विलास पाटील व सत्यजीत विलास पाटील ही तिन्ही मुलं अनाथ झाली आहेत. आई वडिलांनी मुलांच्या लहानपणीच सोडून जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना त्यांची आत्या एकमेव सहारा ठरली आहे. घरो घरी केसांवर भांडी विकून संसार चालवणाऱ्या आत्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतांना सुद्धा भाऊ व वाहिनी गेल्यामुळे तिघे मुलांना अंगाशी लावून खूप मोठा आश्रय दिला व स्वतः च्या मुलां प्रमाणे संभाळ करीत आहे. मात्र यापुढे मुलांना उदरनिर्वाह करिता सहारा मिळावा म्हणून याकरिता रावेर येथील तहसीलदार कार्यालयात संजय गांधी योजनेतून काही  मदत मिळेल, या आशेने अर्ज केलेला होता. सदरची परीस्थितीचे गांभीर्य  समजताच २ ऑगस्ट रोजी अनाथ बलाकांसाठी ‘नाथ’ ठरून तात्काळ मजुरी पत्र तयार करून त्यांच्या घरी गेले व मंजुरी पत्रद्वारे मायेची उब दिली.

 

तसेच बाल संगोपण योजना व अनाथ प्रमाणप्रत्र बाबत पालकांना माहिती दिली असुन सदर योजनाचा लाभ तात्काळ देण्यास बालविकास प्रकल्प अधिकारी व सरंक्षण अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. यावेळी बाल संरक्षण अधिकारी मिलिंद जगताप, एकात्मिक बाल विकास अधिकारी जागृती तायडे उपस्थिती होत्या. समजलेल्या माहिती नुसार सदरील अनाथ बालकांचे वडील सर्वात लहान अपत्य १५ दिवसाचे असतांना रक्त भरण्याची गरज भासली असता त्याने रक्त दिले होते. परंतु तेव्हा पडून त्यांना अशक्तपणा जाणवला त्याने शेवटी मृत्यू गाठला. तसेच  त्यांची आई सुद्धा लहान अपत्यसह महिन्याचे असतांना जागाचा नोरोप घेतला. मुलांची आई काही शिकलेले असल्यामुळे तिने मृत्यू अटल असल्याची जाणीव होताच मुलांना पालन पोषण करण्यासाठी नणंदच्या नावाने चिट्टी लिहून ठेवली असल्याचे सांगण्यात आले. अशा हृदयद्रावक घटनेने ग्रासलेल्या कुटुंबाला समाजातून मदतीची गरज आहे.

Protected Content