सारोळा बुद्रुक सरपंच पदी सुनिता भिल यांची बिनविरोध निवड

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सारोळा बुद्रुक तालुका पाचोरा येथील सरपंचपदी सुनिता सिताराम भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सारोळा बुद्रुक तालुका पाचोरा येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव निघाल्यानंतर सन – २०२१ ऑगस्टमधे झालेल्या निवडणुकीत ह्या जागेसाठी उमेदवार न मिळाल्याने ही जागा व सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत सुनिता सिताराम भिल ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. सरपंच पदासाठी दि. २७ रोजी निवडणूक मंडळ अधिकारी प्रतिक्षा नामदेव मनोरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली या निवडणुकीत सुनिता भिल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सरपंच पदी बिनविरोध घोषित करण्यात आले.

यावेळी उपसरपंच अविनाश मधूकर देशमुख, सदस्य वाल्मीक जगन्नाथ पाटील, अनिरुद्ध नाना पाटील, पुनम दिपक पाटील, सुनंदा संजय अहिरे, सुनिता सिताराम भिल व ग्रामसेवक उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!