किरण कुमार बकाले अखेर निलंबीत : अजून कठोर कारवाईची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आक्षेपार्ह टिपण्णी प्रकरणी एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांना नियंत्रण कक्षात बदली केल्यानंतर रात्री उशीरा निलंबीत करण्यात आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, काल दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता. याबाबत एसपींकडे मागणी देखील करण्यात आली होती.

या अनुषंगाने काल रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले आहेत. तसेच जिल्ह्यात त्यांच्यामुळे वातावरण तापले असल्याने त्यांना जळगाव सोडण्याचे देखील सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content