महिलेचे बंद घर फोडून सामानांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात एका महिलेचे बंद घराचा दरवाजा तोडून घरातून सामानांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत रविवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रंजना अशोक ठाकूर (वय-३४) रा. भुसावळ यांच्या आईचे घर जळगाव शहरातील गेंदलाल मिल येथे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आईचे घर बंद होते. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते ५ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील सिलिंग फॅन, इन्व्हर्टर बॅटरी, गॅस सिलेंडर, पाण्याची मोटर, फ्रिज ऍम्प्लिफायर या इतर सामान असा ऐकून १६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर शहर पोलीस ठाणे ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रंजना अशोक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

Protected Content