डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करा : मुकुंद सपकाळे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकूंद सपकाळे यांनी केले आहे. अजिंठा विश्रामगृहातील आयोजित बैठकीत ते बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकूंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली शहरातील आंबेडकरवादी नागरिकांची तसेच उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे नियोजन करून विविध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करीत असताना आनंद उत्सवाला “उन्मादाचे स्वरूप” देऊ नका. उन्मत्त होऊन मिरवणुकीत उन्मादाचे  विकृत प्रदर्शन न करता संयम, शिस्त, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत मिरवणुकीत येथेच्छ नाचून आनंदाचा उत्सव साजरा करावा. बॅरिस्टर, समाजशास्त्रज्ञ, राज्य शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती आहे. याचे भान ठेवत जयंती उत्सव साजरा करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे यांनी महानगर जयंती उत्सव समितीच्या बैठकीत केले.

या बैठकीत महानगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पगारे, उपाध्यक्ष सोनू अढाले सचिव पंकज सोनवणे, सल्लागार दिलीप सपकाळे, माजी नगरसेवक राजू मोरे, नगरसेवक सुरेश सोनवणे, संजय सपकाळे, भरत सोनवणे, मिलिंद सोनवणे, विकी सोनवणे, वाल्मिक सपकाळे, प्रकाश वाघ, राधे शिरसाट, समाधान सोनवणे, प्रज्ञानंद तायडे,आनंदा तायडे, गौतम सपकाळे, यशवंत घोडेस्वार, प्रताप बनसोडे,सचिन अडकमोल, संजय बागुल, चंद्रकांत नन्नवरे, विनोद सूर्यवंशी, युवराज सुरवाडे, उत्तम सपकाळे, आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content