गिरणा परिक्रमामध्ये खा. उन्मेष पाटलांचे ठिकठिकाणी स्वागत

जळगाव प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या गिरणा परिक्रमा यात्रेतील चौथ्या टप्यालाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून त्यांचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत केले.

खासदार उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमा यात्रेतील चौथा टप्पा शनिवारी आणि रविवारी पार पडला. शनिवारी सकाळी गिरणा परिक्रमेच्या चौथ्या टप्प्यास दहिगाव संत येथून प्रारंभ झाला. तेथून डोकलखेडा, वरसाडे, माहिजी, कुरंगी, दुसखेडा आणि शेवटी परधाडे गावाला दुसर्‍या टप्प्याची सांगता झाली. परिक्रमेत खासदार पाटील, तालुकाध्यक्ष शिंदे यांनी सर्व गावांत जनतेशी संवाद साधला.

रविवारी सायंकाळी खासदार उन्मेष पाटील यांची गिरणा परिक्रमा यात्रा कुरंगी येथे आली. या ठिकाणी भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जि.प. सदस्य मधू काटे, पं.स. सदस्य बन्सीलाल पाटील, कुरंगीच्या सरपंच मनीषा पाटील, ग्रा.पं. सदस्य सीमा पाटील, मंगला पाटील, योगेश ठाकरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून वाळू चोरी व अवैध धंदे संपूर्ण बंद करणारे कुरंगी हे जिल्ह्यातील सक्रिय लोकसहभाग असलेले गाव असून हे गाव आदर्श गाव आराखड्यात समाविष्ट करावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांना सांगणार आहे. तसेच हे आदर्श गाव खासदार या नात्याने ग्रामविकासासाठी मी दत्तक घेत असल्याची घोषणा केली.

Protected Content