महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या जमावावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सालार नगरजवळील राष्ट्रीय महामार्गावर जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघ करून बेकायदेशीर मंडळी जमवून रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकर्त्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर बसवावी या मागणीसाठी सालार नगरातील नागरीकांनी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. यात मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, रास्ता रोको झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या रास्ता रोको आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. बेकायदेशीर व जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबेल मंदार पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता माणियार बिरादरीचे फारूख शेख , शेख ताहेर इब्राहिम, ॲड. जुबेर जहांगिर खान, शोएब देशमुख, आयाझ खान, हुजेफा अतीक, अभियंता जाहीद शेख, शाकीर मुजावर, वसीम मिर्जा, इम्रान सलिम, राशिद ताहेर शेख, इब्राहिम शेख सर्व रा. सालार नगर जळगाव यांच्यासह २० ते २५ महिला व पुरूष यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content