नशिराबाद रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद जवळील पाटील नर्सरीजवळ घडली. याप्रकरणी शनिवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

किशोर भास्कर झाल्टे (वय-२४) रा. पातोंडा ता. नांदूरा जि. बुलढाणा असे मयताचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, किशोर झाल्टे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी काम करून उदरनिर्वाह करत होते. २२ जानेवारी रोजी  किशोर झाल्टे आणि त्याचा मित्र दिपक मधूकर सुरळकर रा. कोथळी ता. मोंढाळा जि. बुलढाणा हे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच २८ बीजे ९३०) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव येथे येत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील पाटील नर्सरीकडून जळगावकडे येत असतांना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वात किशोर झाल्टे हा जागीच ठार झाला तर दिपक सुरळकर हा गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मयत किशोर झाल्टे यांचे वडील भास्कार श्रीराम झाल्टे यांच्या फिर्यादीवरून शनिवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.

Protected Content