‘त्या’ अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव दुचाकी ट्रकवर आदळल्याने ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघाताप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

प्रवीण साईनदास पवार (वय ३६, रा.अयोध्या नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, प्रवीण पाटील हे आई, पत्नी, बहिण आणि मुलगा यांच्यासह अयोध्या नगरात वास्तव्याला आहे. सुप्रिम कॉलनीत मेडीकल चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते मेडीकलवर (एमएच १९ डीएम ३८९८) ने जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रक (एमएच १९ झेड ८७२) वर दुचाकी आदळली. झालेल्या अपघातात प्रविण पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अमलदार मुदस्सर काझी यांनी प्रवीण यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनी त्यांना तेथून खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत होते. अपघात होताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या अपघात प्रकरणी शनीवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री पोलीस नाईक मुदस्सर काझी यांच्या फिर्यादीवरून मयत दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content