अल्पवयीन मुलीचा विनयभंग; अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुरुवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मामासह नातेवाईकांसोबत वास्तव्याला आहे.  शाळेत ये जा करत असताना गावात राहणारा अजय दिलीप बाविस्कर हा तिचा पाठलाग करून तिच्यासमोर नाचण्याचा प्रयत्न करतो. ९ डिसेंबर रोजी अल्पवयीन  मुलगी ही तिच्या मामाच्या मुली सोबत बॅडमिंटन खेळत असताना अजय बाविस्कर हा त्या ठिकाणी येऊन तिचा हात पकडला व विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तातडीने अमळनेर पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अजय दिलीप बाविस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहे.

Protected Content