जगवानी नगरातील विवाहितेचा एका लाखासाठी छळ

पतीसह चार जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षा घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून उपाशी ठेवत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, “जळगाव शहरातील जगवानी नगरातील माहेर असलेल्या प्रणाली राहूल खरात (वय-२०) यांचा राहूल कृष्णा खरात रा.वरणगाव ता. भुसावळ यांच्याशी २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला आहे. लग्नाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यानंतर पती राहूल खरात हा काहीही कामधंदा न करात दारूचे व्यसन जडले. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू व दोन नणंद यांनी विवाहितेविषयी पती राहूल खरात याच्या मनात कटूता निर्माण केली.

दरम्यान, माहेरहून रिक्षा घेण्यासाठी १ लाख रूपये आणावे यासाठी पती राहूल खरात याने तगादा लावला व पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला उपाशी ठेवत शारिरीक छळ केला.

त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून दिले. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरूवारी २४ मार्च रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पती राहूल खरात, सासू मंगला कृष्णा खरात, नणंद वर्षा उल्हास तायडे, रेशमा कृष्णा खरात सर्व रा. वरणगाव ता. भुसावळ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!