आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संपाला आज सहावा दिवस आहे. मात्र, राज्यसरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू अंतर्गत असलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेतर्फे निदर्शने करून याचा निषेध करण्यात आला.

 

आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेतर्फे राज्य सरकारने  संपाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही सहा हजार रुपयांच्या पगारात जीवावर उदार होऊन घरोघरी जाऊन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना  किमान वेतन,  तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता व प्रलंबित असलेले लाभ त्वरितअदा करावेत  यासह इतर मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला आशा व गटप्रवर्तक समन्वय समिती मागण्याचे निवेदन सादर केले आहे. आरोग्य मंत्रालय संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले. मात्र त्वरित निर्णय घेऊन त्यांना प्रोत्साहन भत्ता, किमान वेतन देता येणार नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज २१  जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येत येवून  बेमुदत संप सुरू ठेवण्यात येईल असा निर्धार कॉ. विजय पवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कॉ. शारदा  लुटे,  कॉ. रत्ना मोरे,  कॉ. यास्मिन पटेल, कॉ. प्रतिभा कोळी, कॉ. कविता वाणी, कॉ. प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.

 

Protected Content