कोरोना : जिल्ह्यात आज ३१८ रूग्ण आढळले; १३५ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ३१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. १३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- १२३, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-२४, अमळनेर-११, चोपडा-३०, पाचोरा-०, भडगाव-५, धरणगाव-१६, यावल-१०, एरंडोल-२, जामनेर-१९, रावेर-१४, पारोळा-११, चाळीसगाव-२४, मुक्ताईनगर-११, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३१८ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ६० हजार १८२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ६८९ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून २ हजार ११० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content