Home क्राईम भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडविले; दुचाकीस्वार तरूण जागीच ठार !

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडविले; दुचाकीस्वार तरूण जागीच ठार !


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फत्तेपूर येथील देऊळगाव गुजरी ते धामणगाव बढे मार्गावर एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर पुंडलिक माळेकर (वय २७, रा. सिंदखेड लपाली, जि. बुलढाणा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, सागर माळेकर हा तरूण १७ मे रोजी सकाळी ११ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच २८ के ९०३९)वरून धामणगाव बढे ते देऊळगाव गुजरी या मार्गाने जात होता. याच दरम्यान, रस्त्यालगतच्या शेतातून ट्रॅक्टर (क्र. एमएच २८ एझेड ९०५४) च्या चालकाने रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा कोणताही अंदाज न घेता आणि आजूबाजूला न बघता आपले वाहन अत्यंत हयगयीने व भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावर आणले. या निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टरने सागरच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सागरला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील हे करीत ओह.


Protected Content

Play sound