Home क्राईम वरणगावजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविले : चौघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ !

वरणगावजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविले : चौघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ !

0
226


वरणगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीवरून चाललेल्या चौघांना भरधाव वाहनाने उडविल्याची घटना घडली असून या भीषण अपघातात महिलेसह चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

वरणगाव शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना वरणगावजवळ एमएच १९ ईव्ही ५३५३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात या बाईकवरील चौघे गंभीर जखमी झाले. यात जय शंकर काळे या दुचाकीस्वारासह ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय-३०) आणि विघ्नेश शंकर चव्हाण (वय-१४) व मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय-एक) या चौघांचा समावेश होता.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले. येथे या चौघांना मृत घोषीत करण्यात आले. या भयंकर घटनेमुळे वरणगावच्या कपिलनगर भागावर शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound