पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून समाज बांधव रस्त्यावर उतरले असुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सचिन सोमवंशी यांनी केले आहे
मराठा आरक्षण १६ टक्के दिल्यावर टिकु शकले नाही तेच आरक्षण तात्काळ केंद्र सरकार दिले पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चा चे लाखो मोर्चे महाराष्ट्रात शिस्त बध्द झाले. मात्र शासनाला याची कदर नव्हती. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही जर मानसिकता भाजपा – शिंदे सेना – राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट), सत्ताधारी पक्षांसह विरोधातील पक्षांची असेल तर मग विरोध कुणाचा तात्काळ प्रश्न सुटायला पाहिजे पण तशी मानसिकता सत्तेतील मुजोरांची दिसत नाही. एकीकडे मराठ्यांना कामाला लावायचे आणि दुसरीकडे ओबीसींची जागर यात्रा काढायची हे सामान्य जनतेला कळणार नाही असे होईल का? मात्र जनता बघत आहे हिशोब बाकी आहे.
मराठा विरोधात ओबीसी असा वाद निर्माण करुन नेमका कुणाला राजकीय फायदा होईल हे जनतेला माहिती आहे असे श्री सोमवंशी यांनी म्हटले असून पाचोरा तालुक्यातील गावागावात राजकीय फलकांसह प्रवेश बंदी शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा करत असुन पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवा अन्यथा होणार्या परीणामास हेच जबाबदार राहतील.