भांडे विक्रेत्याला अनोळखी दोघांकडून धारदार वस्तूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पोलन पेठ येथील भांडे विक्रेत्याला डब्बा खरेदी करण्यावरून झालेल्या वादातून दोन अनोळखी व्यक्तींनी धारदार वस्तूने वार करून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता घडला आहे. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विनोद माधव वाघ वय-४९ रा. शिव कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून भांडे विक्रीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता विनोद वाघ हे दुकानात भांडे विक्रीसाठी बसलेले होते. त्यावेळी दुकानात अनोळखी दोन जण आले. दुकानात असलेला डब्बा खरेदीसाठी हातात घेतला. त्यावेळी दुकानदार यांनी दोघांना “डब्बा घ्यायचा आहे का, डब्या घ्यायचा असेल तर हातात डब्बा उचला, नाहीतर डब्बा खाली ठेवा” असे सांगितले. याचा राग आल्याने अनोळखी दोघांनी दुकानदाराला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून मारहाण केली. आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर भांडे विक्रेते विनोद वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रात्री ८.३० वाजता अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहे.

Protected Content