तरूणासह आई व भाचीला पाच जणांकडून मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील तरूणाने इच्छेविरूध्द लग्न केल्याच्या कारणावरून मुलीच्या वडीलांसह नातेवाईकांनी तरूणासह त्याची आई व भाची यांना बेदम मारहाण केली. तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरूणाला देखील दमदाटी केल्याची घटना मंगळवार ७ मे रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार ८ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण करणारे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, विश्वदीप सुरेश देवरे वय २९ रा. कल्याण ह.मु. मुंदखेडा ता. चाळीसगाव येथे परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारे नामदेव भिला पाटील यांच्या इच्छेविरूध्द त्यांच्या मुलीशी विश्वदीप देवरे याने लग्न केले. याचा राग मनात ठेवून मंगळवारी ७ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नामदेव भिला पाटील, सतिष बळीराम पाटील, राहूल भरत पाटील, पवन बळीराम पाटील, प्रमोद चैत्राम पाटील सर्व रा. मुंदखेडा ता. चाळीसगाव यांनी रस्ता आडवून विश्वदीपसह त्याची आई कांताबाई सुरेश देवरे व भाची यांना मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेला विश्वदीपचा चुलतभाऊ गणेश किशोर देवरे याला देखील दमदाटी करून धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विश्वदीप याने दुसऱ्या दिवशी बुधवारी ८ मे रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे नामदेव भिला पाटील, सतिष बळीराम पाटील, राहूल भरत पाटील, पवन बळीराम पाटील, प्रमोद चैत्राम पाटील सर्व रा. मुंदखेडा ता. चाळीसगाव यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप माने हे करीत आहे.

Protected Content