किरकोळ कारणावरून एकाला दगडाने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सोनी नगरात दुचाकीच्या चाकाने दगड उडून मुलीला लागल्याचा जाब विचारल्यावरून एकाला दगडाने मारहाण व शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सोनी नगरात गणेश नारायण जाधव हे वास्तव्याला आहे. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुकेश प्रजापती (वय-३५) रा. सोनी नगर, जळगाव हा त्याची दुचाकीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीच्या चाकाने दगड उडाल्याने गणेश जाधव यांच्या मुलीला लागला. याचा जाब गणेश जाधवा यांनी मुकेश प्रजापती याला विचारला. याचा राग असल्याने मुकेश याने गणेश जाधव यांना दगड डोक्याला मारून दुखापत केली. त्यानंतर शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर गणेश जाधव यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मुकेश प्रजापती याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

Protected Content