जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील शिरसोली रोडवरील एका हॉटेल जवळून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोलीरोड परिसरातील एका हॉटेल जवळ ,१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार दुपारी ३.३० वाजता उघडकीला आला. दरम्यान नातेवाईकांनी पीडित मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पीडित मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहे