सुसाट कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वराड गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर धरणगाव पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल वसंत पाटील (वय-33, रा.मराठाखेडा ता.पारोळा) हे शांताराम हिरामण पाटील (रा. शिवशांती नगर एरंडोल) यांच्यासोबत 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता दुचाकी क्रमांक (एमएच 19 एएल 3169) याने धरणगाव तालुक्यातील बांभोरीहून घरी जात असताना वराड गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर मागून येणाऱ्या कार्यक्रमांक (एमएच 19 सीझेड 3286) ने जोरदार धडक दिली या अपघातात गोपाल पाटील आणि शांताराम पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता गोपाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालका विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content