वृध्द महिलेच्या हातातील पेन्शनची रक्कम चोरट्याने लांबविली

 

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेन्शनची रक्कम बँकेतून काढून घरी नेत असताना एकाने हातचालाकी करून वृद्ध महिलेच्या हातातील १० हजार रुपयांची रोकड पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बेगमबी अब्दुल शेख (वय-६५) रा. जाम मोहल्ला मशिदीजवळ, भुसावळ या वयोवृद्ध महिला आपली पेन्शन घेण्यासाठी भुसावळ शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत आल्या होत्या. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी बँक खात्यातून १० हजार रुपयांची रोकड काढली. त्यानंतर एक अज्ञात अनोळखी भामटा वृद्ध महिलेजवळ येऊन नोटांवरील नंबर लिहून घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर हातचालाकीने त्यांच्या जवळील १० हजार रुपयांची रोकड लंपास करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर वृद्ध महिलेने तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.

Protected Content