राष्ट्रवादीच्या विचारांना अन् पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग – प्रदेशाध्यक्ष

फैजपूर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला धर्मनिरपेक्ष विचारांचा मोठा इतिहास आहे. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन याच फैजपूरमध्ये झाले होते. ज्या रावेर विधानसभा मतदारसंघात फैजपूरचा समावेश होतो. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या विचारांना आणि शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इथे बुथ कमिट्यांवर लक्ष केंद्रीत करावं आणि संघटनेला बळकटी द्यावी.”, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने फैजपूर येथे बोलताना केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मा.आ. मनिष जैन, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content