…आढावा राष्ट्रवादीचा अन् चर्चा माजी मंत्री खडसे-पाटलांच्या गुप्तगुची

रावेर प्रतिनिधी । फैजपुर येथील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आ.अरुण पाटील यांचा गुप्तगु चर्चा करतांना फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुमारे दहा वर्षानंतर खडसे-पाटील समर्थकांना असलेला अपेक्षित भेटीचा योग आज जयंत पाटीलांच्या कार्यक्रमात जुळुन आल्याने भविष्याच्या राजकारणात ही नांदी असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत  आहे.

माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी रावेर मतदार संघातुन दोन वेळेस भाजपा कडून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. मराठा समाजातुन येणाऱ्या माजी आ पाटील यांचे रावेरसह आजु-बाजूच्या तालुक्यावर प्रचंड प्रभाव आहे.भाजपामध्ये असतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी असलेले मतभेद सर्वसुत असतांना. २००९ च्या विधासभा निवडणुकीत विद्यमान आमदार असतांना भाजपा कडून पाटलांचे  तिकीट कापण्यात आल्याने श्री पाटील नाराज होऊन भाजपाला रामराम केला व  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला होता.या सर्व गोष्टीना दहा वर्षाच्या वर कालावधी उलटला आहे.त्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुध्दा भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने प्रथमच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या आढवा बैठकीत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला पाटील-खडसेची गुप्तगु आगामी निवडणुकीची नांदी मानली जात आहे.व दोघांचे चर्चा करतांनाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

 

Protected Content