संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न

रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी उपस्थित राहत घेतला श्रवनानंद

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘कांदा मुळा भाजी, अवघा विठाई माझी’ अशा अभंगाद्वारे आपल्या दैनंदिन कामातच देव शोधण्याचा संदेश देणारे संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माळी समाज पंच मंडळतर्फ़े किर्तन सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी सोहळ्यास उपस्थित राहून संत सावता माळी महाराज यांना अभिवादन केलं आणि सुमधुर किर्तनाचा श्रवनानंद घेतला.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, जि.प.सदस्य निलेश पाटील, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, बाळा भालशंकर, संजय कोळी, संजय माळी, भागवत बोंबटकर, रामदास माळी, गणेश माळी, ज्ञानेश्वर माळी, प्रकाश माळी, प्रल्हाद माळी, प्रमोद माळी, भुपेंद्र चौधरी आणि समाज बांधव उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.