तोंडापूर येथील पुरातन काळातील बारवची केली साफसफाई !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे इंग्रजांच्या काळातील पुरातन बारोव आहे. या ठिकाणी मोठे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. तोंडापूर गावातील तरूणांनी पुढाकार घेत बाराव मध्ये स्वच्छता अभियान राबवून साफसफाई करण्यात आली आहे.

जामनेर तालुक्यातील निसर्गाच्या सौंदर्य लाभलेलं तोंडापूर परिसर असून या गावांमध्ये इंग्रजांच्या काळातील पुरातन बारोव आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. सदर तरुणांनी पुढाकार घेत संपूर्ण बारोवमध्ये स्वच्छता अभियान राबवून साफसफाई बारोवची साफसफाई करण्यात आली. धुळे येथील एक्स फोर या टीमच्या सदस्य प्रशांत शर्मा यांनी तरुणांना प्रोसाईत केले. यावेळी भूषण कानळदे, भागवत गवळी, संजय पवार, सचिन महाजन, गजानन पोटदुखे, चेतन आहेर, रवींद्र निंबाळकर, यश पाटील, कुणाल भाई, जितेंद्र पाटील, नवनाथ भुतेकर, मयूर चिखले यांच्यासह इतर तरूणांनी स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. येणाऱ्या काळात या पुरातन असलेल्या बारोव या वास्तूची संवर्धन करून या ठिकाणी मोठा उत्सव भरवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या पुरातन इतिहासातील वास्तूचे देखभाल करण्याकडे पुरातन विभागाने दुर्लक्ष केले असून सदर या वास्तूकडे पुरातन विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती व देखभाल करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे.

Protected Content