पाळधी येथे कार मधून विक्री होणारी अवैध देशी-विदेशी दारू जप्त

पहूर. ता.जामनेर रविंद्र लाठे । येथून जवळच असलेल्या पाळधी रस्त्यावर धरणाच्या भिंती जवळ आज एका पांढर्‍या रंगाच्या मारुती सुझुकी कार मध्ये विकल्या जाणार्‍या २.३४ लाख रूपयांच्या अवैध देशी-विदेशी दारूसह संबंधीत कार जप्त करून काला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, लॉकडाऊन काळात अवैध दारू विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. सर्वत्र या आशयाच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांची पहूर पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी तात्काळ दखल घेत गुप्त माहिती वरून पाळधी येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या हिजरा नाला जवळील भिंती जवळ पांढर्‍या रंगाची मारुती सुझूकी क्रमांक एम.एच.४३एबी५६३६या कारची झडती घेतली असता मागील डिकीत व सिटखाली देशी-विदेशी दारु,बिअर एकुण,कारसह २लाख३४हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

दरम्यान, या संदर्भात संशयित संदिप जालमसिंग पाटील(वय३२, रा.ओझर बु. ता.जामनेर) याच्या विरुद्ध पहूर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवडे, सहा. फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे, चालक संजय सोनवणे या पथकाने केली. या कारवाई ने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तर कारवाईचे स्वागत होत आहे.

Protected Content