रा. का. मिश्र विद्या मंदिरात ”जल बेल” कार्यक्रम उत्साहात

bahadurpur

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथे रा.का.मिश्र विद्या मंदिरात “जल बेल” विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील विज्ञान शिक्षक एस.बी.चौधरी यांनी विद्यालयातील माध्यमिक व जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना पाणी पिण्याचे फायदे, पाणी कसे प्यावे, किती प्यावे आणि केव्हा प्यावे आणि त्याचे उदाहरणे देत महत्त्व पटवून दिले.

तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रमाणबद्ध व अनेक हास्य विनोदातून स्वच्छतेचे महत्त्व आरोग्य टिप्स देण्यात आल्या. याचबरोबर, विद्यार्थ्यांनी रोज शाळेत येतांना स्वच्छ बाटलीत पिण्याचे पाणी आणावे. पाणी नेहमी हळूवार पध्दतीने प्यावे. यावेळी पिण्याचे फायदे, पाणी कसे प्यावे, किती प्यावे आणि केव्हा प्यावे, याचे प्रात्याक्षिक करुन दाखवले. यानंतर विद्यार्थ्यांनी ते प्रात्यक्षिक स्वत: करुन पाहिले. आणि हे दररोज करत असतांना अभ्यासांच्या तासिकेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे देखील यावेळी सांगण्यात आले. अशा पद्धतीने विद्यालयात दररोज ‘जल बेल’ होणार आहे. याप्रसंगी विद्यालयाचे सत्र प्रमुख ठाकरे, बाविस्कर, शिवदे व सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राध्यापक बी.व्ही. सोनार यांनी केले.

Protected Content