मनसेच्या ‘त्या’ इशाऱ्याने शिक्षणाधिकारी यांचे मुख्याध्यापकांना पत्र

notice to the jalgaon zp ceo 20180588764

जळगाव, प्रतिनिधी | आज अॅड. जमील देशपांडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे जिल्ह्यातील शाळांमध्ये दुपार सत्रातील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यावर कामाच्या बहाण्याने थांबवून ठेवल्यास मनसे स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. याची माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पत्र काढले आहे.

दुपार सत्रातील शाळा सायंकाळी ५ वाजता सुटते यानंतरही काही शिक्षक किंवा शिक्षिका हे विद्यार्थी व विद्यार्थिनींना कार्यलयीन कामाचा बहाणा करून थांबवीत असतात. हे नियमात नसल्याने हा प्रकार न थांबल्यास मनसे प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन मनसे स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी यांनी आजच्या आज मुख्याध्यापक यांना आदेश काढले. या आदेशात त्यांनी मुख्याध्यापकाना सक्त ताकीद दिली असून यात त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांस शाळा सुटल्यावर थांबवून ठेवल्याचे आढळल्यास मुखाध्यापक, प्राचार्य यांना  जबाबदार धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Protected Content