बॉक्सिंग असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल चौधरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनने नवीन कार्यकारिणी/पदाधिकारी नियुक्त केले आहेत. जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी अनिल चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन नवीन कार्यकारिणी /पदाधिकारी (२०२२ ते २०२६) नियुक्ती झाली आहे. तरी जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी  जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अनिल चौधरी यांची निवड झाल्याबद्दल फुलगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार व हार्दिक शुभेच्छा दिल्या व  महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव राकेश तिवारी यांचेशी एजीएममध्ये चर्चा करून लवकरच त्यांच्या अध्यक्षतेखाली भव्य अशी महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा २०२२-२०२३ (ELITE महिला व पुरुष) लवकरच भुसावळ शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे व भरपूर बॉक्सिंग संबंधित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली . जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे नवनियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे आहेत.

सहसचिव – असलम सैय्यद; उपाध्यक्ष- स्वारन संधु; खजिनदार –  स्टीफन डेवी; सभासद- प्रदीप गायकवाड; प्रकाश जाधव; महेंद्र  मेढे; सुनील सोनवणे, रमण भोळे(सर) ,आनंद हुसळे, अॅड.राजेंद्र मालविया तर जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन मधील जुने पदाधिकारी मिलिंद साळुंके (उपाध्यक्ष) व संजय बांगर (सहसचिव) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अन्य पदाधिकारी व सभासद यांच्याशी चर्चा करून  शुभेच्छा दिल्या व  समाधान व्यक्त केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!