उध्दव ठाकरे हे माफिया सेनेचे सरदार : सोमय्यांचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत हे आदित्य ठाकरेंना विचारा असे सांगत उध्दव ठाकरे हे माफिया सेनेचे सरदार असल्याचा हल्लाबोल आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

आज टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना किरीट सोमय्या यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर थेट जोरदार टीका केली. ते म्हणाले की, नंदकिशोर चतुर्वेदी आणि उध्दव ठाकरे यांचे थेट संबंध असल्याचे अनेक पुरावे आहेत. यामुळे आता तो कुठे आहे याची माहिती आदित्य ठाकरे देऊ शकतील. चतुर्वेदी हा कुठेही लपलेला असला तरी आपण त्याला शोधून काढणारच असल्याचा पुनरूच्चार सोमय्या यांनी केला.

याप्रसंगी सोमय्या म्हणाले की, राज्यात महावसुली सरकार आहे. सचिन वाझे याला पोलीस खात्यात घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी शिफारस केली होती. तेथून १०० कोटी रूपयांच्या वसुलीचे रॅकेट आणि हिरेने यांचे खून प्रकरण घडले. यानंतर आता नंदकिशोर चतुर्वेदी यांचे प्रकरण समोर आल्याने राज्य सरकार हे वसुलीचे काम करत असल्याचे उघड झाले आहे. ही शिवसेना नसून माफिया सेना आहे, अन् उध्दव ठाकरे त्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी याप्रसंगी केली.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!