एका तपानंतर तरुणाचा तिरळेपणा शस्त्रक्रियेने झाला दूर

जळगाव प्रतिनिधी । लहानपणी सायकलचे हॅण्डल लागले आणि तिरळेपणा आला. परिणामी तिरळेपणाची सवय करत तब्बल बारा वर्षे उलटली. कुणी तरी देवाच्या रुपात आले आणि डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या मार्ग दाखविला आणि आश्‍चर्य एका तपाच्या तपश्चर्येनंतर तिरळेपणावर यशस्वी शस्त्रक्रियमुळे बावीस वर्षीय तरुणाची दृष्टी सामान्य झाली. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोग विभागाच्या प्रयत्नांमुळेच हे सर्व शक्य झाले.

अशातच एका बावीस वर्षीय तरुणाला घेऊन त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले आणि नेत्ररोग विभागातील सर्जन डॉ.प्रिती लालसरे-पाटील यांना भेटले, याप्रसंगी डॉक्टरांनी त्याची हिस्ट्री जाणून घेतली. दरम्यान हा तरुण ९-१० वर्षांचा असतांना सायकलवरुन पडला आणि हॅण्डलचा फटका त्याच्या डाव्या डोळ्याला लागला, तेव्हापासून त्याल तिरळेपणाची समस्या सुरु झाली. तिरळेपणावर उपचार होतात, पुन्हा पूर्ववत डोळा होऊ शकतो याची कुटूंबियांना कल्पना नव्हती आणि तिरळेपणाचा न्यूनगंड मनात ठेवून त्या तरुणाचे आयुष्य काढणे सुरु झाले. आयुष्यातील बालपण आणि तारुण्याची सुरुवात असा १२ वर्षांचा काळ गेला, एक तप उलटले. आणि आश्‍चर्य एके दिवशी वृत्‍तपत्राच्या माध्यमातून तसेच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या लोकप्रियतेमुळे त्या तरुणाला तिरळेपणावरील उपचाराची माहिती मिळाली आणि तो रुग्णालयात आला. याप्रसंगी डॉ.प्रिती यांनी त्याच्या संपूर्ण डोळ्यांची तपासणी केली आणि तिरळेपणावरील शस्त्रक्रिया करुन दृष्टी पूर्ववत होऊ शकते असे सांगितले आणि त्या तरुणासह नातेवाईकांना आनंद झाला आणि त्यांनी लगेचच ऑपरेशनसाठी तयारी दाखविली. 

गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली निदान, चाचण्या, उपचार या सुविधा असल्याने लगेचच त्याच्या फिटनेससाठी आवश्यक असलेल्या रक्‍त, लघवी अशा विविध चाचण्या करुन घेण्यात आल्यात. एक ते दिड तासात शस्त्रक्रिया झाली आणि ती यशस्वी ठरली, आत त्या तरुणाला पूर्वीप्रमाणे स्पष्ट, मान खाली वर न करता दिसायला लागल्याने त्याने आभार मानले. ही शस्त्रक्रिया नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रिती लालसरे-पाटील यांनी केली असून त्यांना डॉ.अनुजा गाडगीळ यांचे सहकार्य लाभले. तिरळेपणावर वेळीच उपचार गरजेचे – डॉ.प्रिती लालसरे-पाटील तिरळेपणा हा जन्म:जात असो किंवा आयुष्यात काही घटनांमुळे आलेला असो, त्यावर उपचार उपलब्ध आहे. वेळीच उपचार केले तर अगदी चष्मा लावून सुद्धा रुग्ण बरा होवू शकतो, शस्त्रक्रियेची आवश्यकत भासत नाही. महत्वाचे म्हणजे अशा प्रकारचे काही व्यंग आले की व्यक्‍तीच्या मनात न्यूनगंड तयार होतो, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो, त्यासाठी वेळीच लक्ष देवून उपचार घेतले तर सामान्य आयुष्य जगण्याचा आनंद घेता येतो.

 

Protected Content